
नाशिक | Nashik
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटाचे (Thackeray Group) काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) एकही माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी पक्ष सोडणार नाही, असा ठाम दावा केला होता. पंरतु, राऊत मुंबईला परतताच नाशकात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे...
शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक व महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्यासह १० माजी नगरसेवकांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला नाशकात मोठा धक्का बसला आहे.
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांमध्ये अजय बोरस्तेंसह, रमेश धोंगडे, सुर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, सुवर्णा मटाले, ज्योती खोले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खाडे, प्रताप मेहरोलिया यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सचिन ढिकले यांचा समावेश आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.