केंद्राच्या माध्यमातून येवल्यात साकारणार टेक्सटाइल इंडस्ट्री

केंद्राच्या माध्यमातून येवल्यात साकारणार टेक्सटाइल इंडस्ट्री

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येवल्यातील (Yeola) टेक्सटाइल इंडस्ट्रीसाठी (Textile industry) केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिले...

वस्त्र समितीचे सचिव ए. बी. चव्हाण, संत कबीर पुरस्कार विजेते पैठणी विणकर शांतीलाल भांडगे, तहसीलदार प्रमोद हिले, माजी नगराध्यक्षा उषा शिंदे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते पैठणी विणकर रमेशसिंह परदेशी, गणेश खळेकर आदींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

वस्त्र समिती, केंद्रीय वस्त्र मंत्रालय व भारत सरकारतर्फे येवल्यातील पैठणी (Paithani) विणकरांसाठी शहरात हॅन्डलूम मार्क योजना (Handloom mark scheme) आणि मोबाइल ॲपवरील क्लस्टर स्तरावरील जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पैठणी विणकर व हातमाग विणकरांना मार्गदर्शन करताना डॉ. भारती पवार बोलत होत्या.

काठपदरासह इंचन इंच जागेत खऱ्या अर्थाने खुललेली भरजरी जरतारी येवल्याची पैठणी सातासमुद्रापार गेली आहे. पैठणीमुळे येवल्याचे नाव आधीच पोहोचलेले आहे. येवल्याची (Yeola) पैठणी आपल्या हस्तकलेतून साकारताना येथील विणकर फार कष्टाचे काम करतात. विणकरांची फसवणूक होवू नये.

यासाठी केंद्र सरकारच्या (Central Government) वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वस्त्र समितीने तयार केलेल्या हॅन्डलूम मार्कचा वापर करून मोबाइल ॲपच्या (Mobile App) माध्यमातून विणकरांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी डॉ. भारती पवार यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com