TET exam scam : उत्तर प्रदेशातून एकास अटक

TET exam scam : उत्तर प्रदेशातून एकास अटक

टीईटी परीक्षा घोटाळा (TET exam scam) प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सौरभ त्रिपाठी असं आहे. सौरभ त्रिपाठी हा जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेतलं आहे.

TET exam scam : उत्तर प्रदेशातून एकास अटक
S-400 missile भारताचे सुरक्षाकवच चीन-पाकचे क्षेपणास्त्र करणार निष्पभ्र

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET exam scam) सौरभ त्रिपाठीला लखनऊमधून अटक केली आहे. सौरभ त्रिपाठीची 'विनर' नावाची कंपनी आहे. या कंपनीने 2017 साली शिक्षण परिषदेचे परीक्षा घेण्याचे कंत्राट जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीला मिळवून देण्यासाठी लायझनिंगचे काम केले होते.

अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम सौरभ त्रिपाठी हा करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली आहे. अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com