जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीर
मुख्य बातम्या

स्वातंत्र्य दिनापूर्वी काश्मिरात दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

3 जवान जखमी: उद्या उपराज्यपाल मनोज सिन्हा करणार ध्वजारोहण

jitendra zavar

jitendra zavar

Terrorists attack police party in J-K’s Nowgam, 2 killed

श्रीनगर : Shrinagar

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये स्वातंत्रदिनापुर्वी दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, तर 3 जवान जखमी झाले आहे. या हल्ल्यात एक तरुणही जखमी झाला आहे. जखमींना सध्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणेकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. शनिवारी, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी उपराज्यपाल मनोज सिन्हा ध्वजारोहण करणार आहेत. दहशतवाद्यांकडून नौगाममध्ये 15 ऑगस्टला सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस टीमला आपले लक्ष्य केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com