
दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात एएसआय विनोद कुमार यांनी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांकडून नाक्यावर तपासणी करत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर हल्ला केला. ही घटना गोंगू क्रॉसिंग परिसरातील आहे.
दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवल्यानंतर सुरक्षा दलानंही तातडीनं प्रत्युत्तर दिलं आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू असून यंत्रणा अर्लट मोडवर आहेत.