Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशजम्मूच्या राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला; पाच जवान शहीद

जम्मूच्या राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला; पाच जवान शहीद

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतीय लष्कराच्या वाहनावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या वाहनावर जम्मू काश्मीरच्या राजौरी (Rajouri) जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला केला आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद (Indian Soldires Shahid) झाले आहेत…

- Advertisement -

राजौरीच्या जंगलात दहशतवादी (Terrorist Attack) आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. त्यामुळे आता संपूर्ण राजौरीमध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात एका लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत.

या चकमकीत काही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात जवानांना यश आले असून भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरूच आहेत. मुसळधार पाऊस आणि दृष्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत २० एप्रिल रोजी अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.

“मी प्रियांका गांधींना रस्त्यावर…”; स्मृती ईराणींच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

याप्रकरणातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याकरता ३ मे पासून अभियान राबवण्यात आले असून आज सकाळी 7.30 च्या सुमारास एका शोध पथकाला एका गुहेत दहशतवाद्यांचा एक गट लपल्याची माहिती मिळाली. हा परिसर खडकाळ आणि उंच खडकांनी वेढलेला आहे. जेव्हा सुरक्षा दल तिथे पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर दिले. स्फोट झाला. यात पाच जवान शहीद झाले, तर एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहे.

जखमींना तातडीने उपचार मिळावेत म्हणून त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, चार जखमींपैकी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या