भयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेद

भयानक : धुळ्यात तरूणाचा  शिरच्छेद

धुळे । dhule । प्रतिनिधी

शहरानजीक असलेल्या अवधान शिवारात मोहाडी परिसरातील तरुणाचे (youth) शिर धडावेगळे (Headless)करुन निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली. या घटनेमुळे शहर हादरले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे कारण समजू शकले नाही.

भयानक : धुळ्यात तरूणाचा  शिरच्छेद
गंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आग

तरुणाचे शिर अज्ञातस्थळी फेकून दिले असावे अथवा कुत्र्यांनी ते शिर खाण्यासाठी कुठेतरी नेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस फौजफाटासह घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाच्या शिराचा शोध घेतला जात आहे. ज्या ठिकाणी तरूणाची हत्या झाली. त्या जवळच बिअरचे तीन टीन आणि तीन प्लास्टीक ग्लासही आढळून आले आहेत.

शहरातील मोहाडी उपनगरातील नित्यानंद नगर परिसरात राहणारा सतीश बापू मिस्तरी अशी मृत तरुणाची ओळख पटली आहे. त्याच्या एका हातावर सतीश असे नाव लिहिलेले आहे. तर दोन्ही हातावर टॅटू काढलेला आहे.सतीशला दोन भाऊ असल्याचे कळते.

भयानक : धुळ्यात तरूणाचा  शिरच्छेद
Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

निवृत्त पोलिस कर्मचारी महेंद्र वाघ हे आज सकाळी अवधान शिवारातील सोना दोर या कंपनीच्या मागच्या बाजूस बकर्‍या चारण्यासाठी आले होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास बकर्‍यांना घराच्या दिशेने पाठवत जात असताना त्यांना मृतदेह आढळून आला.त्यांनी मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी एपीआय भूषण कोते, पीएसआय हेमंत राऊत, पोना किरण कोठावदे, बापूजी पाटील,मुकेश मोरे,राहुल गुंजाळ, विजय चौधरी, चेतन माळी, जयेश पाटील, एलसीबीचे एपीआय प्रकाश पाटील, पीएसआय बाळासाहेब पाटील, पोना रविंद्र राठोड, कुणाल पानपाटील, विशाल पाटील, उमेश पवार,संदीप सरग, श्रीशैल जाधव, सुरेश भालेराव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात भादंवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भयानक : धुळ्यात तरूणाचा  शिरच्छेद
Makeup Part 4 # असा करा Self makeup
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com