Monday, April 29, 2024
Homeक्रीडाटेनिस चॅम्पियन लिएंडर पेस तृणमूलमध्ये दाखल

टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस तृणमूलमध्ये दाखल

पणजी :

तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस(Leander Paes), नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनी आज औपचारिकरित्या तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress)प्रवेश केला.

- Advertisement -

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘मी इथे तुमचे हक्क हिरावून घेण्यासाठी आलेले नाही तर तुमची मदत करण्यासाठी आले आहे. दिल्लीची दादागिरी चालणार नाही. संविधानाचा पाया मजबूत राहावा हीच आमची इच्छा आहे. गोव्यात संस्कृती आणि वारसा कायम राहावा यासाठी संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचा तृणमूलची इच्छा आहे. गोवेकरांची मान नेहमी उंचावून, सन्मानानं जगावं ही आमची इच्छा आहे.

कोण आहे लिएंडर पेस

पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिसपटू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत.

लिएंडर गोव्याचा, आई-वडील खेळाडू

लिएंडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिएंडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिएंडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या