पंचवटीसह दहा गाड्या रद्द

पंचवटीसह दहा गाड्या रद्द

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

ठाणे-दिवा पाचव्या Thane- Diva Railway Line आणि सहाव्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी Railway Line Works मध्य रेल्वे ब्लॉक घेणार आहे Mega block by central railway. त्यामुळे शनिवारी (ता.8) आणि रविवारी (ता.9) पंचवटी आणि जालना एक्सप्रेस, तर 7, 8, 9 जानेवारीला राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

एकूण दहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द केलेल्या ट्रेन- मनमाड-मुंबई पंचवटी (8, 9 जाने.), मुंबई - जालना (8, 9.जाने.), जालना- मुंबई एक्सप्रेस (8, 9 जाने.), मुंबई-अमरावती एक्सप्रेस (7, 8 व 9 जाने.), अमरावती-मुंबई एक्सप्रेस (7, 8 जाने.),

नांदेड- मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (7, 8 जाने.) मुंबई-नांदेड राज्यराणी (8, 9 जाने.), नागपूर-मुंबई सेवाग्राम (7, 8 जाने.), मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (8, 9 जाने.).

गेल्या रविवारीही पंचवटी व अन्य काही गाड्या रद्द या कारणाच रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वैद्यकीय उपचार, शिक्षण, पर्यटन आदी कामासाठी मुंबईला जाणार्‍या नाशिककरांची गैरसोय झाली होती. त्यातच एसटी सेवा विस्कळीत झालेली असल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com