बापरे! आतापर्यंत महाराष्ट्रात १० मंत्री, २० आमदारांना करोनाचा संसर्ग

बापरे! आतापर्यंत महाराष्ट्रात १० मंत्री, २० आमदारांना करोनाचा संसर्ग
करोनामुक्त

पुणे | प्रतिनिधी Pune

राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना करोनाचा संसर्ग (ten ministers and 20 mlas covid positive in maharashtra) झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit pawar) यांनी दिली. जर यापुढेही राज्यातील बाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते, असे संकेतही त्यांनी दिले....

करोनामुक्त
बापरे! आतापर्यंत महाराष्ट्रात १० मंत्री, २० आमदारांना करोनाचा संसर्ग

गेल्या काही महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येचा खाली येणार आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते आहे.

दुसरीकडे करोनाच्या डेल्टा विषाणूसह (Delta Variant), ओमायक्रॉनच्या रुग्णांची (Omicron Patients) संख्याही वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. अधिवेशनाच्या कालावधीत केवळ पाच दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदारांना करोनाची लागण झाली. नुकतीच राज्य सरकारने करोनाची नवी नियमावली जाहीर केली आहे. (Government new guidlines issue on Thursday)

लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सरकारही प्रयत्न करतंय. आताच नियम कडक का असा आग्रह करु नये, सर्वांनी सहकार्य करावं, असंही पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com