Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती; 'हे' आहे कारण

राज्यातील पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती; ‘हे’ आहे कारण

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत गृहखात्याच्या झालेल्या बैठकीत १४ हजार ९५६ पोलीस शिपाई पदांच्या भरतीबाबत महत्वाचा निर्णय घेतला होता. पंरतु आता या पोलीस भरती प्रक्रियेला राज्य सरकारने (State Government) तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे…

- Advertisement -

याबाबतचे एक पत्रक राज्य सरकारने काढले असून ते पत्रक पोलीस महासंचालकांनी (Director General of Police) राज्यातील आयुक्त (Commissioner) आणि पोलीस अधीक्षकांना (Superintendent) पाठवले आहे. या पत्रकात सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून पोलीस भरती झाली नसून अनेक तरुण वयोमर्यादेत बसत नाही. त्यामुळे पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी केली जात असल्याने भरती पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. तसेच येत्या १ नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या