मंदिरे बंद, पण व्हिआयपींसाठी सुरु

शिवसेना खासदार-आमदारांचे व्हिआयपी दर्शन
मंदिरे बंद, पण व्हिआयपींसाठी सुरु

औरंगाबाद-

राज्यातील मंदिरे (temple)उघडण्यासाठी भाजप(bjp), मनसे (mns)आक्रमक झाली असतांना शिवसेना (shiv sena)खासदार आणि आमदारांना विशेष दर्शन दिले जात आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे मात्र नियम धुडकावून मंदिरात (mandir)अभिषेक करत असल्याचे समोर आले होते. आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी देखील मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे फुटेज समोर आले आहे. आता औरंगाबादेत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी महादेव मंदिरात अभिषेक केला. यासंदर्भात फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मंदिरे बंद, पण व्हिआयपींसाठी सुरु
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

राज्यातील महाविकास आघाडीतील सत्तेत असलेल्या प्रमुख पक्षातील आमदारांकडूनच मंदिरांच्या बंद आदेशाला तिलांजली दिल्याचा हा प्रकार समोर आल्याने भाजपला संधी चालून आली आहे. त्यामुळे भाजपकडून हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे मागील काही वर्षांपासून शहरात हूर्सलच्या हरसिद्धीमातेपासून कावड यात्रा काढून खडकेश्‍वर येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करत आहेत. या यात्रेने आजवर अनेक विक्रम देखील केले आहे. यातच पंरपरा खंडीत होवू नये, म्हणून ही कावड यात्रा कोरोना काळातही गतवर्षी आणि यंदा मोजक्याच भाविकांच्या सहभागाने काढण्यात आली. भाजपच्या शंखनाद आंदोलनाच्या आदल्याच दिवशी रविवारी ही कावड यात्रा काढण्यात आली. खडकेश्‍वर येथील महादेव मंदिर बंद असतानाही ते उघडून तेथे महाआरती व जलाभिषेक करण्यात आला. कोरोनामुळे अद्याप राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवागनी दिलेली नसतानाही दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी हे महादेव मंदिर उघडून जलाभिषेक केल्याने कायदा हा केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जलाभिषेक करताना मंदिरात शिवसेनेचे शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, संतोष जेजूरकर, माजी नगरसेवक गोपाळ कुलकर्णी, किशोर नागरे, गजानन मनगटे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या काही कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com