Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादिंडोरी तालुक्यात थंडीची चाहूल

दिंडोरी तालुक्यात थंडीची चाहूल

ओझे | विलास ढाकणे

दिंडोरी तालुक्यात सध्या गुलाबी थंडीची चाहूल निर्माण झाल्याने बळीराजांच्या रब्बी हंगामातील पिकांना घेण्याची लगबग सुरू झाली आहे. थंडीतील रब्बी हंगाम कसा राहिल यांची चिंता सध्या शेतकरी वर्गाला लागली आहे.

- Advertisement -

पावसाळा आता जवळ जवळ संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. यंदा पावसाने आपला लहरी पणा दाखवत थैमान घातले. परतीच्या पावसाने तर कहरच केला.त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचे होणारे आगमन जवळ जवळ एक महिना उशीर झाले.

यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाने रब्बी हंगामासाठी कंबर कसली असुन भांडवल कसे उभे करायचे हा सर्वात मोठा प्रश्न शेतकरी वर्गासमोर ‘आ’ वासून उभा राहिला आहे. खरीप हंगामातील पिके परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करुन टाकल्याने नगदी भांडवल मिळून देणारे पिकांनी ही मोठ्या प्रमाणात नाराजी केल्याने आता रब्बीला उभे करण्यासाठी भांडवल कसे उभे करायचे ही समस्या गहण होवून बसली आहे.

तालुक्यातील शेतकरी वर्ग रब्बी हंगामात गहू व हरभरा हे पिके महत्त्वाचे मानतो. परंतु यंदा पावसाचा कालखंड वाढल्याने तालुक्यात यंदा रब्बी हंगामाला महिना दिड महिना उशीर सुरूवात होणार असे चिञ दिसत आहे.

निसर्गाने नटलेल्या दिंडोरीच्या ग्रामीण भागात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. ही थंडी हळूहळू दिंडोरी तालुकावासीयांना सुखद धक्का देत आहे. पहाटे पायी प्रवास करणारे नागरिकांना थंडीचा थोड्या फार प्रमाणात गारवा जाणून घेत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभ होण्याच्या अगोदर थंडीची जाणीव जनतेला होऊ लागली आहे.

ऑक्टोबरच्या उन्हाने तापलेल्या दिंडोरीकरांना थंडीची प्रतिक्षा होती.गेले दोन ते तीन दिवस दाट धुके पाहायला मिळत आहे. तर गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी भल्या पहाटे उठून ग्रामस्थ फेरफटका मारतांना दिसत आहे.

यावर्षी परतीच्या पाऊस पडल्याने साहजिकच थंडीही लांबणीवर पडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु सध्या थंडी अवतरली असल्यामुळे जनता आनंद लुटत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार खरी थंडी १५ नोव्हेंबर नंतर पडण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचे दुःख बाजुला सारुन तालुक्यातील शेतकरी वर्गाने रब्बी हंगामाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. या वर्षी पाणी टंचाई चे कुठलेही संकट नसल्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेञफळ वाढण्याची शक्यता बोलली जात आहे.

खरीपातील कसर रब्बीत भरून निघेल अशी येथील आशा शेतकरी वर्गाला लागून राहिली आहे. यासाठी बांधावर रब्बीचे गहू,हरभरा यांचे बियाने अनुदानात उपलब्ध करून देण्याची गरज असून कृषी विभागाने यासाठी मदतीचा हात शेतकरी वर्गाला द्यावा.अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

१) हिवाळा ऋतू हा आरोग्यदायी असल्यामुळे पहाटे फेरफटका मारताना नागरिक दिसत आहे.

२)शेकुटीचे आगमन लवकरच होणार.

३)यंदा थंडीचे प्रमाण जास्त असण्याचे संकेत.

४) रब्बीचे यंदा क्षेत्र वाढणार.

५)थंडीच्या आगमनाने नागरिकांमध्ये आनंदाची लहर.

- Advertisment -

ताज्या बातम्या