भंगाराच्या गोदामाला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू

भंगाराच्या गोदामाला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद| Hyderabad

तेलंगणातील (Telangana) हैदराबादमध्ये (Hyderabad) आगीची मोठी घटना समोर आली असून या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Hyderabad Fire News)

हैदराबादमधील भोईगुडा परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तब्बल तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवत होते. (Hyderabad fire tragedy)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ कामगार पहिल्या माळ्यावर झोपले असतानाच तळमजल्यावर गोडाऊनला आग लागली. यावेळी कामगारांकडे तेथून बाहेर पडण्यासाठी तळमजल्यावरुन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र शटर बंद होतं.

तसंच, भंगाराच्या गोडाऊनमध्ये दारुच्या मोकळ्या बाटल्या, पेपर, प्लास्टिक, केबल अशा अनेक गोष्टी होत्या. पहिला माळा दुसऱ्या माळ्यासोबत जोडला होता. पहिल्या माळ्यावर दोन रुम होत्या. सर्व ११ मृतदेह एकमेकांच्या अंगावर पडलेले होते. मृतदेहांची ओळखही पटू शकत नाही इतके जळाले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिकंदराबादमधील भोईगुडा भंगार दुकानाला लागलेल्या आगीत बिहारमधील कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आणि मुख्य सचिवांना या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे मृतदेह बिहारला पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com