Friday, April 26, 2024
Homeक्रीडाशरद पवारांचा पंच : भारतीय खेळाडूंना मिळाली ही सुट

शरद पवारांचा पंच : भारतीय खेळाडूंना मिळाली ही सुट

मुंबई:

ऑस्ट्रेलियात नमवून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचे जंगी स्वागत झाले. परंतु विदेशातून आलेल्या या खेळाडूंना नियमानुसार क्वारंटिन व्हावे लागणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वारंटिनच्या नियमांमधून सूट देण्यात आली.

- Advertisement -

कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यामुळे युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना ७ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि ७ दिवस घरीच क्वारंटाईन व्हावं लागते.

गुरुवारी कर्णधार अजिंक्य राहणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. हे पण मायदेशी दाखल झालेल्या खेळाडूंना नियमांमधून सवलत देण्यात आली.

काल ऑस्ट्रेलियावरून निघालेले भारतीय खेळाडू दुबईमार्गे आज मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबई महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार त्यांनी क्वारंटिन करण्यात येणार होते. खेळाडूंना क्वारंटिन न करण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून विजय मिळवून मुंबईत परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वारंटिन न करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल महापालिकेला आदेश दिले. त्यानंतर खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे या खेळाडूंना दुबईवरून येत असले तरी त्यांना क्वारंटाईनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे.

इंग्लड टेस्टला मुकले असते

भारतीय खेळाडूंना मुंबईमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले असते तर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये सहभागी होता आलं नसते, कारण ५ फेब्रुवारीपर्यंत त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले असते. भारत आणि इंग्लंड यांच्यातली टेस्ट सीरिजही ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यासाठी भारतीय टीम २७ जानेवारीला बायो-बबलमध्ये जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या