पुरस्कार घेण्यासाठी शिक्षकांना करावी लागणार वर्षभर प्रतीक्षा
USER

पुरस्कार घेण्यासाठी शिक्षकांना करावी लागणार वर्षभर प्रतीक्षा

अर्थसंकल्पात निधीची तरतूदच नाही

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शिक्षकदिनाच्या ( Teachers Day ) पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्काराची ( Teachers Awards ) घोषणा करण्यात आली. ही घोषणा होण्याबरोबरच शिक्षकदिनी (दि.५ ) या पुरस्कारांचे वितरण होणे अपेक्षित होते.तशी अपेक्षा शिक्षकांना होती.मात्र,पुरस्कार वितरणासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात निधीची ( Funds ) तरतूदच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा होणार नसून, पुरस्कार स्वीकरण्यासाठी शिक्षकांना तब्बल वर्षभर प्रतिक्षा करावी लागणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे यंदा तरी, पुरस्काराला मुहुर्त लागणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली आहे.

पुरस्कारासाठी जिल्हाभरातून ४५ प्रस्ताव प्राप्त होणे अपेक्षित असताना केवळ २३ प्रस्तावच प्राप्त झाले होते. त्यातून १५ आदर्श शिक्षकांची नावे जाहीर झाली आहे. प्रशासनाने शिक्षक पुरस्काराला यंदा खंड पडू दिलेला नसला तरी, प्रत्यक्षात पुरस्कार वितरण मात्र होणार नाही. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प सादर करतांना शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

परंतू, सभेत चर्चे दरम्यान, सेस वाढविण्याच्या अट्टाहासापायी सदस्यांनी यंदा करोनाचे सावट असल्याचे कारण पुढे करत शिक्षक पुरस्कार सोहळा होणार नाही त्यासाठी तरतूद कशाला असा प्रश्न करत निधी तरतूदिला कात्री लावली होती. या हेडला केवळ ५० हजार रूपयांची तरतूद केली आहे. निधीची तरतूद नसल्या कारणाने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रत्यक्षात पुरस्कार स्वीकारण्यासाठी वर्षभर प्रतिक्षा करावी लागणार आहे. पुरस्कार घोषीत झाले असले तरी, त्यांचे वितरण होणार नसल्याने शिक्षकदिनी शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com