Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedराज्यातील २०१३ नंतरच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्राची पडताळणी

राज्यातील २०१३ नंतरच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्राची पडताळणी

टीईटी गैरव्यवहार (TET exam) प्रकरणी आता मोठी कारवाई होणार आहे. राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या ‘टीईटी’ उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

- Advertisement -

बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्यांचा शोध घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेत (TET exam) गैरव्यवहार उघडकीस आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे.

TET परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची माहिती पुढे आली होती. तसेच हा गैरव्यवहार उघड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पडताळणीतून बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्या शिक्षकांचा शोध लागण्याची शक्यता आहे. सध्या सहाशे प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी आता करण्यात येईल.

काय आहे प्रकरण ?

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी टीईटी परीक्षेत अपात्र उमेदवारांकडून दलालांमार्फत पैसे घेऊन परीक्षार्थीचे गुण वाढवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना २०१८ च्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून कोटय़वधींची रक्कम, दागिने ताब्यात घेतले आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या अनुषंगाने प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आह़े

- Advertisment -

ताज्या बातम्या