Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशTeacher day : शिक्षक दिनीच शिक्षकाने विद्यार्थ्याला धो धो धुतलं... Video Viral

Teacher day : शिक्षक दिनीच शिक्षकाने विद्यार्थ्याला धो धो धुतलं… Video Viral

दिल्ली | Delhi

मंगळवारी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षक दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम साजरे झाले. अभिनंदनाचे मेसेज आणि सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, यात एक व्हिडीओ खूप गाजतोय. एक =व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वर्ग शिक्षकदिनानिमित्त फुग्यांनी सजवण्यात आलं आहे. तुम्ही पाहू शकता सगळे विद्यार्थी खाली जमिनीवर बसले आहे. अशातच एक विद्यार्थी पार्टी स्प्रे फवारण्यास सुरुवात करतो. मग काय शिक्षक संतापले आणि त्यांनी विद्यार्थ्याला भर क्लासरुममध्ये धो धो धुतलं. आनंदाचं क्षणाचा एका सेकंदा चुरडा झाला.

…तर पाकिस्तान करणार ‘INDIA’ नावावर दावा? काय आहे प्रकरण?

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर म्हणजेच X वरील @HasnaZaruriHai या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडिया इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. हा मजेदार व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे. विद्यार्थ्याचं हे कृत्य पाहून इतर विद्यार्थीही देखील हसू लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या