Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यातुझ्या हातून लावलेलं झाड जगणार नाही; विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून रोखले

तुझ्या हातून लावलेलं झाड जगणार नाही; विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून रोखले

नाशिक | Nashik

तुला मासिक पाळी (Menstrual cycle) आली आहे त्यामुळे तू लावलेले झाड (Tree) जगणार नाही असे म्हणत एका शिक्षकाने मुलीला (Girls) वृक्षारोपणापासून (Plantation) रोखल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar Taluka) घडला आहे. याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असून शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, देवगाव (Devgaon) येथे शासकीय कन्या आश्रमशाळा (Government Girls Hostel) असून या ठिकाणी इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. या ठिकाणी अनेक मुली शिक्षण घेत आहेत. मागील आठवड्यात या शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका मुलीला मासिक पाळी आली होती. त्यावेळी एका शिक्षकाने या मुलीला ‘तू झाड लावू नको कारण झाड जगणार नाही’ असे शाळेतील इतर मुलींच्या समोर सांगत वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याची घटना घडली.

दरम्यान, आश्रम शाळेतील या घटनेमुळे शिक्षकाविरुद्ध (Teacher) तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांसह श्रमजीवी संघटनेने (Shramajeevi Sanghatana) केली आहे. तसेच या शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्यानुसार (Abolition of Superstitions Act) पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली जात आहे.

एकीकडे देशाच्या राष्ट्रपतीपदी एक आदिवासी महिला विराजमान झालेली असताना दुसरीकडे एका आदिवासी मुलीला अशी हीन वागणूक दिली जात असल्याची घटना दुर्दैवी आहे. संबंधित शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

भगवान मधे (जिल्हा सरचिटणीस श्रमजीवी संघटना)

- Advertisment -

ताज्या बातम्या