Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याची केंद्राची तयारी

पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याची केंद्राची तयारी

नवी दिल्ली :

करोनामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटक्यांमुळे केंद्र सरकार (Government of India) पुन्हा एका पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी (Petrol Diesel Excise Duty) वाढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे महागाई अधिकच वाढणार आहे.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेलवर ३ ते ६ रुपये प्रति लीटरपर्यंत एक्साइज ड्यूटी वाढवली जाण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांकडूनच ही माहिती मिळाली.

आयएएनएसच्या रिपोर्टनुसार सरकार करोना संकटामुळे तयार झालेल्या परिस्थितीत महसूल जमा करण्याची तयारी चालवली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवून आर्थिक वर्षात ६० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवू शकतो. या वर्षाचा विचार केल्यास हा महसू ३० हजार कोटी रुपये होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांद्वारा सतत टॅक्स वाढवला जात असल्याने, क्रूड स्वस्त होण्याचा फायदा ग्राहकांना मिळत नसून, त्यांना पेट्रोल-डिझेलसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.

पेट्रोलवर लागणार टॅक्स आणि कमिशन –

एक्स फॅक्टरी किंमत – 25.32 रुपये

भाडे आणि इतर खर्च – 0.36 रुपये

एक्साइज ड्यूटी – 32.98 रुपये

डीलर कमीशन – 3.69 रुपये

VAT – 18.71 रुपये

- Advertisment -

ताज्या बातम्या