Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रवाळू माफियांना रंगेहाथ पकडण्यासाठी तलाठी उतरले नदीत, मात्र पोहताना अचानक...

वाळू माफियांना रंगेहाथ पकडण्यासाठी तलाठी उतरले नदीत, मात्र पोहताना अचानक…

परभणी | parbhani

परभणीत अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथील पूर्णा नदीच्या पात्रातून हिंगोली आणि परभणी दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरूच असतो…

- Advertisement -

या परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तलाठी सुभाष होळ, तलाठी धनंजय सोनवणे आणि स्थानिक पोलीस पाटील यांनी मिळाली. त्यानंतर तलाठी दिग्रस येथील धक्क्यावर गेले असता तलाठी पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे..,

सुभाष होळ असे बुडालेल्या तलाठींचे नाव आहे. दिग्रस येथील धक्क्यावर वाळू उपसा बंद होता, पण त्याच नदीपात्राच्या पलीकडच्या भागात अवैध वाळू उपसा सुरू होता. हा भाग हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हुडी लिंबाळा शिवाराचा आहे.

गौतमीचं आडनाव पाटील नव्हे तर…; पुन्हा नव्या वादाला फुटलं तोंड

या वाळू धक्क्यावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसताच तलाठी सुभाष होळ हे कारवाई करण्यासाठी पाण्यातून पलीकडे पोहत जात होते. पलीकडच्या काठावर जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गोदावरी नदीकाठी प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

तलाठी सुभाष होळ यांना पोहताना अचानक दम लागला असावा आणि ते पाण्यात बुडाले असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून नदी पात्रात त्यांचा शोध घेतला जात आहे.

Hingoli Accident News : ट्रकचा भीषण अपघात; १५० मेंढ्यांसह ५ जणांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या