Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याअवैध व बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा - भुजबळ

अवैध व बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा – भुजबळ

मुंबई | Mumbai

मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) अवैध तसेच बनावट दारू (Fake Alcohol) विक्रीमुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. हा प्रकार बिहारसह इतर राज्यात होतो असे नाही आपल्या राज्यातही अवैध तसेच बनावट दारू विक्रीचे प्रकार घडत असून हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे यातील मुख्य आरोपीला अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तारांकीत प्रश्नाद्वारे सभागृहात केली….

- Advertisement -

७२ तास चकवा देणाऱ्या अनिल जयसिंघानीला कशी झाली अटक? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

खारघर व नवी मुंबई येथील अवैध दारु वाहतुकीबाबत भुजबळ यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ( State Excise Department) खारघर व नवी मुंबई येथे बेकायदा वाहतूक केली जाणारी साधारण ७६ लाखांची दारु जप्त (Sezied) केली आहे. ही हलक्या प्रतीची गोव्यात बनविण्यात आलेली दारू गुजरातमध्ये (Gujarat) नेऊन नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्यात येत आहे. हे प्रकार मुंबईसह राज्यात होत असून बनावट व अवैध दारूमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ही बाब गंभीर असून मुख्य आरोपीला शोधून हे प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी कठोरात कठोर कारवाई अशी मागणी त्यांनी केली.

नाशिकच्या ट्रेकरचा माळशेज घाट परिसरात मृत्यू

त्यावर उत्तरात माहिती देताना मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) म्हणाले की, सदर प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ खाली गु.र. क्र. २५२ / २०२२ नोंदविण्यात आला असून याप्रकरणी जप्त केलेल्या मुद्देमालाची वाहनासह एकूण किंमत अंदाजे रुपये ७६.७७ लाख इतकी आहे. तर सदर प्रकरणात चार आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोरात कठोर कलम लावून कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

व्हॉट्सअ‍प ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या