मुंबई मनपा सोबत विधानसभेचीही निवडणूक घ्या

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अमित शहा यांना आव्हान
मुंबई मनपा सोबत विधानसभेचीही निवडणूक घ्या

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिंदे गट आणि भाजपवर सडकून निशाणा साधला. आज ही एवढी गर्दी आहे, दसऱ्याला किती असेल? किती पटीत असेल, दसरा मेळावा आपल्या पंरपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

पहिले मुंबई काय आहे हे माहीत करून घ्या, मुंबईला जाणून घ्या; मुंबईला गिळंकृत करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही.अमित शाह देशाचे गृहमंत्री मुंबईत येवून गेले आणि काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही इथे जमिनीतून ही फक्त गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही पेंग्विन आणले. चित्ता आणला ते चांगलंच केलं. सरकार असताना आम्ही निर्णय घेतले होते त्याला यांनी स्थगिती दिली. वरळीत आरे डेअरीच्या इकडे जागतिक दर्जाचं मत्सालय झालंच पाहिजे. त्यासाठी मी संमती दिली आहे. पण हे जर का मध्ये आणले आणि पुन्हा तिथे इमारती केल्या तर काय करणार? लोकांना घरं बांधा. मुंबई संपूर्ण देशाचं आर्थिक केंद्र आहे, त्या आर्थिक केंद्र शहरातून आर्थिक केंद्र तुमच्या राज्यात पळवता? असे ही ठाकरे यांनी सांगितले

मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. तोडा फोडो राज्य करा ही निती महाराष्ट्रात शक्य नाही. हिंदू-मुसलमान भेदभाव शक्य नाही. म्हणून मी अमित शाहांना आव्हान देतोय. तुमचे चेले-चपाटे इथे बसले आहेत ना, त्यांना सांगा, हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणुका महिन्याभरात घेवून दाखवा. त्याहून पुढे हिंमत असेल तर त्याच वेळेला विधानसभेची निवडणूक घेवून दाखवा. कुस्ती आम्हालासुद्धा येते. आमची तर तीच परंपरा आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. असे आव्हान ठाकरे यांनी अमित शहा यांना केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com