Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याशहरात कोविड लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज : आयुक्त जाधव

शहरात कोविड लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज : आयुक्त जाधव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणासंदर्भात तयारीबाबत शासनाकडुन आलेल्या निर्देशानुसार तयारी पुर्ण करण्यात आली असुन पहिल्या टप्प्यात वैद्यकिय विभागातील मनपा, सरकारी व खाजगी रुग्णालयातील सेवक अशा सुमारे दहा हजार सेवकांची नोंदणी अंतीम टप्प्यात असुन कोविड लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्या या सर्वांना करोना लसीकरण केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

- Advertisement -

राज्य शासनाच्या आदेशाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाकडुन कोविड लसीकरणाची तयारी अंतीम टप्प्यात आली असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना कोविड लसीकरण केले जाणार असुन सरकारी व खाजगी रुग्णालयातील 8 ते 10 हजार सेवकांना लसीकरण केले जाणार असुन त्यांची नोंदणी पुर्णत्वाकडे आली आहे. ही लस 2 ते 8 अंश सेल्सीअस तापमानात सामान्य फ्रिजर मध्ये ठेवता येणार आहे. यामुळे तुर्त मोठ्या शितगृहाच्या व्यवस्थेची गरज लागणार नाही.

दुसर्‍या टप्प्यात 18 वर्षावरील वयोगटातील सामान्यांसह इतरांना कोविड लसीकरण केले जाणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात केल्या जाणार्‍या कोविड लसीकरणाकरिता 17 – 18 ठिकाणी लस सुरक्षित ठेवण्यासाठी शितपेट्यांची व्यवस्था केली जाणार आहे. हे लसीकरण ऐच्छिक असल्याने एकुण 50 ते 60 टक्के नागरिकांना पुढच्या काळात लसीकरणाची शक्यता असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. शासनाच्या पुढील निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविली जाणार असली तरी याकरिता महापालिका यंत्रणा सज्ज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

ढगाळ वातावरणाचे 8 – 15 दिवस धोक्याचे

सध्याचे ढगाळ व अवकाळी पाऊसाचे वातावरण हे विविध प्रकारांच्या विषाणू करिता पोषक असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. या दिवसांमध्ये आढळून येणारे सर्दी-खोकला-ताप, जनरल फ्लू- स्वाईन फ्लू यासारखे आजार वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने रुग्णांनी त्वरित महानगरपालिका किंवा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

नागरिकांनी वारंवार हात धुणे, सॅनिटायझर चा वापर करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग चा पालन करणे या त्रिसूत्रीचा पालन पुढचा 8 ते 15 दिवस करणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे तसेच लग्न समारंभ अथवा अंत्यविधी व इतर कुठलाही कार्यक्रम याठिकाणी गर्दीत जाणे टाळले पाहिजेत. अशाप्रकारे नियमांचे नाशिककरांनी पालन करावेत असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या