जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट; नियोजनाचे आव्हान

गंगापूर धरण समूहात अवघा 48 टक्के पाणीसाठा
जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट;  नियोजनाचे आव्हान

Water Scarcity in the district; The challenge of planning

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरण ( Gangapur Dam ) समूहात अवघा 48 टक्के पाणीसाठा शिल्लक ( Water Stock ) असल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे (water scarcity ) सावट वाढत असल्याची चिन्हे आहे. आताशी एप्रिल महिना सुरु आहे. अद्याप मे आणि जून महिन्याचे पहिले 15 दिवस असे दीड-पावणेदोन महिने बाकी आहेत. त्यामुळे तोपर्यंत पाणी टिकविणे मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 24 पैकी नऊ धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाईचे संकट गहिरे होत असल्याचा धोका वाढला आहे.

यंदाचा उन्हाळा आताच असह्य होत असून, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाण्याची मागणी वाढल्याने धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा कमी होत आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची एकूण 24 धरणे असून, 65 हज़ार 664 दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणीसाठवण क्षमता आहे. गेल्या वर्षी 18 एप्रिलला या धरणांत 28 हजार 211 दशलक्ष घनफूट म्हणजेच 43 टक्के उपयुक्त पाणी शिल्लक होते. यंदा जवळपास तेवढेच 28 हजार 820 दशलक्ष घनफूट अर्थात 44 टक्के पाणी उपलब्ध आहे.

जिल्हावासीयांना सुमारे अडीच महिने हे पाणी पुरेल असे नियोजन करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. त्यातही नऊ धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षाही कमी पाणी उपलब्ध आहे.त्यामुळेया धरणांवर अवलंबून असणार्‍या क्षेत्रात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

गंगापूर धरणात 51 टक्के पाणीसाठा

गंगापूर धरणात 51 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणसमूहात गेल्या वर्षी 42 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा हा पाणीसाठा 48 टक्के आहे. गंगापूर धरणसमूहामध्ये गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या चार धरणांचा समावेश होतो. दारणा आणि मुकणे या धरणांमधील पाण्याचा शहरवासीयांना उपयोग होत असतो.या दोन्ही धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा यंदा कमी आहे.

टँकरची संख्या 11 वर

जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात 6 टँकर देण्यात आलेले होते तीच संख्या आता 11 वर गेली असल्याने पाणी टंचाईचे भीषण संकट जाणवू लागले आहे.

Related Stories

No stories found.