Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यास्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : महापालिकेतर्फे आयोजित रॅलीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : महापालिकेतर्फे आयोजित रॅलीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Swatantryacha Amrut Mahotsav )महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाच्या ( Har Ghar Tiranga Campaign) जनजागृतीसाठी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथून आज (दि.14) बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, नरेंद्र महाजन यांनीही रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. भारत माता की जय ,वंदे मातरम् अशा घोषणा देत थार चार चाकी वाहनाच्या पाठीमागे बाईकस्वारांची रॅली शहरातून निघाली. ग्रिफिन स्कूझर राईडींग ग्रुप आणि ग्रेप सिटी ऑफ रोड्स या दोन ग्रुपनी रॅलीत सहभाग घेतला होता. एकूण 55 बाईकस्वर होते.

मुख्यालयातून पुढे कॅनडा कॉर्नर, गंगापूर रोड, कॉलेज रोड, एबीबी सर्कल, सीटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक, पाथर्डी फाटा, द्वारका अशा मार्गाने जात वंदे मातरम्,भारत माता की जय या घोषणा देत आसमंत उजलून निघाला,स्वातंत्र्य महोत्सवाचे वातावरण तयार करीत पुढे महापालिका नाशिक रोड विभागीय कार्यालयात रॅलीचा समारोप संपन्न झाला.

या ठिकाणी उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर आणि जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम,विभागीय अधिकारी आव्हाड सुनील यांनी बाईकस्वारांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. ग्रेप सिटी ऑफ रोड्स या ग्रुपचे हर्षल कडभाने, ग्रिफिन स्कूझरचे विशू शिंदे, सेवा साधना संस्थेचे दीपक भगत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं तसेच घरोघरी तिरंगा याबाबत महत्व सांगून तरुणाईला त्यांच्या जबाबदारीचे भान करुन दिले.देशाविषयी पुढील पिढीने स्वाभिमान,देशाभिमान बाळगून देशासाठी कार्य करणेबाबत सूचित केले.

ग्रिफिन स्कूझर राईडींग ग्रुप (Griffin Scouser Riding Group)आणि ग्रेप सिटी ऑफ रोड्स(Grape City of Rodes) हे दोन्ही ग्रुप सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यासाठी रायडींग करतात. ‘सेव्ह द सॉईल’ या विषयावर त्यांनी रॅली काढली होती. सामाजिक बांधिलकी म्हणून दुर्गम भागात त्यांनी कपड्यांचं तसेच गरजू वस्तूंचे वाटप करून सामाजिक योगदान देत असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या