Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यास्वामी सागरानंद सरस्वती यांचे देहावसान

स्वामी सागरानंद सरस्वती यांचे देहावसान

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आनंद आखाड्याचे प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती (Swami Sagarand Saraswati) यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन (passed away) झाले आहे. त्यांनी नुकतीच वयाची शंभरी पार केली होती…

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून स्वामी सागरानंद सरस्वती आजारी होते. त्यांच्यावर नाशिकमधील (Nashik) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या आजारपणाच्या काळात आश्रमातील साधुमहंतांनी त्यांची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. तसेच गेल्या सहा दशकांपासून त्र्यंबकनगरीच्या अध्यात्मिक क्षेत्रातील महान तपस्वी साधू म्हणून त्यांची ओळख होती.

स्वामी सागरानंद सरस्वती हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आबालवृद्धांमध्ये परिचित होते. सन १९८९ पासुन कुंभमेळा (Kumbh Mela) व त्याचे महत्व यासाठी त्यांनी आखाडा परिषद महाराष्ट्रात (Maharashtra) स्थापन करुन क्षेत्राचे धार्मिक महत्व व परंपरा अव्याहतपणे टिकुन राहतील यासाठी अविरतपणे प्रयत्न केले. याशिवाय त्यांनी कुंभमेळा कालावधीत आखाड्यांच्या होणाऱ्या वादावर नेहमी तोडगा काढून सामोपचाराने वाद मिटविल्याने त्यांची सर्व भारतीय आखाड्यात विशेष महती होती.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरक्षेत्रासह (Trimbakeshwar) विविध तीर्थ क्षेत्रावर त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे मान होता. त्यांनी भारतातील मोठमोठ्या क्षेत्रावर यज्ञयाग व मुर्ती प्रतिष्ठित सहभाग घेतला होता. त्यांचे राजकीय व धार्मिक क्षेत्रात मोठया स्वरुपात अनुयायी व शिष्य आहेत. आज दुपारी चार वाजता रिंगरोड येथील आनंद आखाड्यात त्यांना समाधी देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या