नाशिक
नाशिक
मुख्य बातम्या

स्वच्छ शहरात इंदूर पहिले: नाशिक कितवे जाणून घ्या...

स्वच्छता सर्वेक्षण २०२० ची यादी जाहीर

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली :

मध्य प्रदेशातील इंदूर शहर सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. नाशिक शहर यात पहिल्या पंधरामध्ये आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण २०२० 'मध्ये परिणामांची घोषणा केली. स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या कॅटगरीमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची निवड करण्यात आली आहे. नाशिक शहराचा टॉप टेनमध्ये येण्यास थोडक्यात मागे राहिले. या यादीत नाशिक ११ व्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील सूरत शहर आहे. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई आहे. एक लाख लोकसंख्येच्या कँट्यागिरीत नाशिक २५ व्या क्रमांकावर आहे.

ही आहेत पहिले १५ शहरे

१ : इंदूर (मध्य प्रदेश)

२ : सुरत (गुजरात)

३ : नवी मुंबई ( महाराष्ट्र)

४ : विजयवाडा ( आंध्र प्रदेश)

५ : अहमदाबाद (गुजरात)

६ : राजकोट (गुजरात)

७ : भोपाळ ( मध्य प्रदेश)

८ : चंदीगड ( चंदीगड)

९ : विशाखापट्टम ( आंध्र प्रदेश)

१० : वडोदरा ( गुजरात)

११ : नाशिक ( महाराष्ट्र)

१२ : लखनऊ ( उत्तर प्रदेश)

१३ : ग्वाल्हेर ( मध्य प्रदेश)

१४ : ठाणे ( महाराष्ट्र)

१५ : पुणे ( महाराष्ट्र)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com