जलसमाधी आंदोलन: राजू शेट्टीच्या आंदोलनाची दखल, उद्या चर्चेला बोलवले

जलसमाधी आंदोलन: राजू शेट्टीच्या आंदोलनाची दखल, उद्या चर्चेला बोलवले

पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti)यांनी सुरू केलेल्या पंचगंगा परिक्रमा यात्रेची आज नृसिंहवाडीत सांगता झाली. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. पूरग्रस्तांचे प्रश्न आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (सोमवार) राजू शेट्टी (raju shetti)यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे. असे मुख्यमंत्र्यांचे पत्र आज नृसिंहवाडी येथे राजू शेट्टी यांना प्रशासनाकडून सर्वांच्या समक्ष देण्यात आले. इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांचे हे पत्र सादर केले.

दरम्यान, संध्याकाळी पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana)आक्रमक झाली असून तीन हजारावर कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीच्या दिशेने रवाना होत आहेत. काही कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या (river) संगमात उडी मारल्याने वाडीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात होता. पोलिसांनी (police)काही विपरीत घडू नये यासाठी सर्व बंदोबस्त केला होता. तरीही काही कार्यकर्ते पंचगंगा नदीपात्रात जाण्यात यशस्वी झाले. एका शेतकऱ्याने थेट नदीपात्रात उडी घेतली. पण पोलिसांनी त्याला तातडीने बोटीत घेतलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जलसमाधी आंदोलन: राजू शेट्टीच्या आंदोलनाची दखल, उद्या चर्चेला बोलवले
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

सायंकाळी पाचनंतर जाहीर सभा होऊन थेट जलसमाधी आंदोलन (jal samadhi andolan)करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्राकडे एकही कार्यकर्ता जाऊ नये यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा बंदोबस्त चुकवत काही कार्यकर्त्यांनी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नदीत उडी मारली. त्यांना यांत्रिक बोटींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. आंदोलक मोठ्या प्रमाणात नदीकाठावर आल्यास गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुरुंदवाड पुलावरच सर्वांना अडवण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाले आहे.

रेस्क्यू फोर्सच्या 10 यांत्रिक बोटी तैनात

कुरुंदवाड येथील कृष्णा घाट, दिनकराव यादव पूल व नदी परिसरात पोलिस आणि रेस्क्यू फोर्सच्या जवानांचे पथक 10 यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस यंत्रणा सतर्क आहे. पोलिस नदी परिसरात यांत्रिक बोटीद्वारे गस्त घालत आहेत.राजू शेट्टी यांनी नृसिंहवाडीत जलसमाधी घेणार, अशी घोषणा केल्याने पोलिस प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. राजू शेट्टींना जलसमाधी घेण्यापासून अटकाव करण्यासाठी पोलिसांनी नृसिंहवाडीत येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तर दिनकरराव यादव पुलाजवळ रेस्क्यू फोर्सची ५ पथके पोलिसांनी तैनात केली आहेत.

जलसमाधी आंदोलन: राजू शेट्टीच्या आंदोलनाची दखल, उद्या चर्चेला बोलवले
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com