आधारतीर्थ आश्रमातील बालकाचा संशयास्पद मृत्यू

आधारतीर्थ आश्रमातील बालकाचा संशयास्पद मृत्यू

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

येथील आधारतीर्थ आश्रमात ( Aadhartirtha Aashram , )उल्हासनगरमधील आलोक विशाल शिंगारे ( Aalok Vishal Shingare ) या चार वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुपादेवी फाटा येथे आधारतीर्थ अनाथ आश्रम असून याठिकाणी राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्तांचे शेकडो अनाथ मुले आहेत आज मंगळवार (दि.२१) रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अनाथ आश्रममध्ये ४ वर्षीय मुलगा गळयावर संशयास्पद खुना असल्याचे विद्यार्थी आणि स्टाफला दिसले.त्यानंतर त्याला अशोक पाटील नामक व्यक्तीने संस्थेच्या वाहनात त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉ राहुल येवले यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

त्यानंतर रुग्णालयाने पोलिसांशी संपर्क साधला असता उपविभागीय पो अधिकारी कविता फडतरे, पो.नि. संदीप रणदिवे, पो.उपनिरीक्षक चंद्रभान जाधव, सचिन गवळी, श्रावण साळवे यांनी अनाथ आश्रममध्ये जाऊन चौकशी केली.

दरम्यान संशयित बालकाच्या गळ्यावर काही खुना असल्याने त्याला कुणीतरी गळा दाबून मारल्याचा संशय ? व्यक्त होत आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com