पाच वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहावर गुलाल, कुंकू : नरबळीचा संशय

पाच वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहावर गुलाल, कुंकू : नरबळीचा संशय
क्राईम

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशीत पाच वर्षीय बालकाचा अपहरण (Kidnapping ) करून गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे उघडकीला आली. निष्पाप बालकाच्या (Child)मृतदेहावर हळद कुंकू, गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. पोलिसांनी (police)या घटनेचा वेगाने तपास सुरू केला आहे.

क्राईम
वाचा, नाशिकमध्ये काय घोषणा केल्या गडकरींनी...

शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राजेश केसरकर असे या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. दोन दिवसांपासून आरव घरातून बेपत्ता झाला होता त्यामुळे पालकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. ग्रामस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी आरवची शोधाशोध सुरू होती. त्याचबरोबर शाहूवाडी पोलिसांनी या शोधासाठी पथके पाठवली होती. मात्र आज सकाळी सहा वाजता आरवचा मृतदेह त्याच्या घराच्या पाठीमागे सापडला.मृतदेहावर हळद कुंकू आणि गुलाल टाकल्याचे निदर्शनास आल्याने ही बातमी कापशी सर पंचक्रोशीत वार्‍यासारखी पसरली.

या अमानुष व क्रूर घटनेमुळे शाहुवाडी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

Related Stories

No stories found.