Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रVideo आमदारांचे निलंबन : भाजपाने भरवली प्रतिविधानसभा

Video आमदारांचे निलंबन : भाजपाने भरवली प्रतिविधानसभा

मुंबई

राज्यात ५ जुलैपासून दोन दिवशीय विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या (monsoon session) पहिल्याच दिवशी विधानसभेत घामासान झाले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात तुफान राडा झाला. यानंतर जयकुमार रावल, (jaykumar rawal) गिरीश महाजनसह (girish mahajan) १२ आमदार (mla) वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली ही प्रतिविधानसभा सुरु आहे.

- Advertisement -

अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. भाजपला (BJP) महाविकास आघाडीने (maha vikas aghadi)असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, (obc) एमपीएससी (mpsc) , अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. परंतु भाजपचे १२ आमदार निलंबित झाले. यामुळे अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी भाजपने सभागृहाच्या बाहेर प्रतिविधानसभा भरवली. भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी तसेच विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केलं. त्याचबरोबर विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवण्यात आली. या प्रतिविधानसभेत सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला.

मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

हे आहेत भाजपचे निलंबित आमदार

आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या