Monday, April 29, 2024
Homeजळगावपणन महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती

पणन महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पणन महासंघाच्या (Panan Federation) संचालक मंडळाच्या (Board of Directors)रचनेमध्ये बदल करण्यासाठी महासंघाच्या उपविधी क्रमांक 37 व 41 (1) मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याकरिता कायद्यातील तरतूदीनुसार कालावधी लागणार आहे. त्यामुळे पणन महासंघाच्या निवडणूक (Elections of Panan Federation) प्रक्रियेला पणन विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांच्या आदेशानुसार स्थगिती (adjournment) देण्यात आली आहे.

- Advertisement -

सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पणन महासंघाच्या उपविधीमधील तरतूद विचारात घेऊन, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत उपविधी क्र. 41 (1) व अन्य काही बदल मंजूर करण्यात येऊन सदरचा उपविधी दुरुस्तीचा प्रस्ताव दिनांक 8 मार्च रोजी पणन संचालक यांना सादर करण्यात आला आहे.

संघिय संस्थेच्या उपविधीतील असोसिएट सभासद संस्थांना संचालक मंडळात 25% प्रतिनिधीत्व देण्याकरीता पणन महासंघाच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत पणन संचालक व विशेष निबंधक सहकारी संस्था यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार उपविधी क्रमांक 37 व 41 (1) मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याकरिता कायद्यातील तरतूदीनुसार कालावधी लागणार आहे.

उपविधीमधील प्रस्तावित दुरुस्ती न झाल्यास पणन महासंघाचे अनेक सदस्य संस्थांचे प्रतिनिधी संचालक मंडळाची निवडणूक लढण्यापासून वंचित राहणार आहेत. सुनील भाऊरावजी फुंडे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन या न्यायालयीन प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेले आदेश लक्षात घेऊन, पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी सर्व सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींना समान संधी देण्यासाठी राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे.

…तर जबाबदार अधिकार्‍यांना दालनात कोंडणार!

- Advertisment -

ताज्या बातम्या