Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याव्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी घेणारे संशयित ताब्यात

व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी घेणारे संशयित ताब्यात

नाशिक। प्रतिनिधी

नवीन नाशकातील उपेंद्रनगरात राहणाऱ्या राजेश कुमार गुप्ता (वय ३९) यांना सोमवारी (दि.४) दुपारी तीन वाजता पिस्तूलचा धाक दाखवून बळजबरीने कारमध्ये बसवून मध्यप्रदेशात नेत १२ लाख ३० हजारांची खंडणी घेतली होती. व्यावसायिक राजेश कुमार गुप्ता यांनी म्हसरुळ पोलिसांत अज्ञात चार संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवला होता.

- Advertisement -

या प्रकरणी संशयित आदित्य एकनाथ सोनवणे (वय २४, रा. म्हाडा कॉलनी, अंबड), तुषार केवल खैरनार (२८, रा. म्हसरूळ) व अजय सुजीत प्रसाद (२४, रा. अंबड) या तिघांना गुन्हेशाखेच्या युनिट एकने अटक केल्याची माहिती गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली. सहा मित्रांनी एकत्रित येत कट रचून व्यावसायिकाचे अपहरण केले. टाेळीचा मास्टरमाईंड खैरनार याला फेब्रिकेशन व्यवसायात तोटा झाला. ताेच भरुन काढण्यासाठी त्यानेच खंडणीचा ‘डाव’ रचून पूर्णत्वास नेल्याचे निष्पन्न झाले आहे.

बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण

याप्रकरणात युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक(प्रभारी) मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यानुसार त्यांच्याकडून साडेतीन लाखांची कार, महागडे मोबाइल, सोन्याचे दोन कानातले, २९ हजार पाचशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर उर्वरित तिघा संशयितांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या