'तो' संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, NIA ने केलं होत अलर्ट

'तो' संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, NIA ने केलं होत अलर्ट

इंदूर | Indore

राष्ट्रीय तपास यंत्रणानी मुंबई पोलिसांना धोकादायक व्यक्ती देशात आला असल्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती.

दरम्यान, एनआयए दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याला ताब्यात घेतले आहे. सरफराजच्या पासपोर्टवर चीन आणि हाँगकाँगला जाण्यासाठी 15 नोंदी आहेत. 2007 मध्ये तो खजराना भागात राहायला आला होता. त्यानंतर त्याने तेथून घर विकले आणि ग्रीन पार्क कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला. मात्र पोलिसांनी छापा टाकलेल्या अपार्टमेंटमध्येही तो सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आई - वडिलांना ताब्यात घेतले.

जेव्हा त्याला याची माहिती मिळाली, तेव्हा तो पोलिसांकडे आला. चौकशीत एनआयए टीमला कळले की, सरफराज पाकिस्तान, चीन आणि हाँगकाँगमध्ये प्रशिक्षण घेऊन भारतात परतला आहे आणि तो भारतात मोठी चळवळ राबवण्याची योजना आखतो आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com