Jammu Kashmir : PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये स्फोट

Jammu Kashmir : PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये स्फोट

जम्मू | Jammu

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आज जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय पंचायत राज (Panchayati Raj) दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते जम्मूमधील सांबा येथे सभेला संबोधित करणार आहेत.

मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीर एक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. जम्मूमधील प्रताप सिंग पुरा ललियाना गावातील शेतात हा स्फोट झाल्याची महिती समोर आली आहे. पोलीस घटना स्थळी पोहोचले असून तपासकार्य सुरु करण्यात आलं आहे.

दरम्यान मोदी काश्मीरमध्ये पोहोचण्याआधी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. हे दोनही दहशवादी पाकिस्तानचे असल्याचे पुरावे यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com