सुषमा अंधारेंचे नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेंविषयी मोठे विधान, म्हणाल्या...

सुषमा अंधारेंचे नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेंविषयी मोठे विधान, म्हणाल्या...

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे गटातील (Uddhav Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेच्या (Mahaprabodhana Yatra) माध्यमातून महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढत असून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. त्यांच्या या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. त्यातच आता अंधारे यांनी भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) असताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे...

त्या म्हणाल्या की, एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. या बाजूला नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)अशी स्थिती होती. नितीन गडकरी (Nitin Gadkari) बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक परेशान, हैराण करायचे. त्यानंतर दुसऱ्या पिढीतही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लोकनेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात आली, असे अंधारे यांनी म्हटले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, मी सुद्धा बीडमधील (Beed) आहे, त्यामुळे त्यांना वाटतंय की ते मला हैराण करू शकतील. मात्र ते भ्रमात आहेत. तुम्ही माझ्यामागे ईडी (ED) लावू शकत नाहीत. उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन नाही. माझ्या नावावर कुठेही जमीन असेल तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझी आई कोरडवाहू जमिनीत राबते. माझ्या कुटुंबियांना राजकारणाबाबत काहीही माहिती नाही, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com