सुषमा अंधारे म्हणतात…मी बाळ, मोठ्या भावाच्या खोड्या काढणारच!

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

‘मी जर तीन महिन्याचे बाळ (baby will be three months old)असेल तर मग मला मोठ्या भावाच्या (elder brother) खोड्या करण्याचा (play pranks) अधिकार असल्याचा टोला (Tola) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare) यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil.) यांना लगावला.

महाप्रबोधन यात्रेच्या निमीत्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या जिल्हा दौर्‍यावर आल्या आहेत. मंगळवारी सकाळी सुषमा अंधारे यांचे आगमन झाले. यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत उध्दव ठाकरे शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. संजय सावंत, युवासेना विस्तारक शरद कोळी उपस्थित होते. या दौर्‍याप्रसंगी अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाळधी परिसरातील उध्दव ठाकरे शिवसेनेने लावलेले सुषमा अंधारे यांच्या स्वागताचे बॅनर चोरीला गेले. यावरुन बोलतांना ये डर मुझे अच्छा लगा असे म्हणत तुम्ही बॅनर चोरु शकतात. शिवसैनिक त्यांचे विचार त्यांची शिवसेनेशी असलेली निष्ठा कशी चोरणार असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.

मग तुम्हाला पाझर का नाही फुटला?

होय मी शिवसेनेवर उध्दव ठाकरेंवर टीका केली. टीकाकार असतांना देखील जेव्हा उध्दव ठाकरेंवर अन्याय झाला तेव्हा आम्हा टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटला मग, तुमच्यावर देवेंद्र फडणवीसांनी अशी काय करणी-भानामती केली, काळी जादू केली की तुम्हाला पाझर फुटला नाही? अश्या शब्दात सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला. तुम्ही मला 3 महिन्याचे बाळ म्हणतात, मग मला मोठ्या भावाच्या खोड्या करण्याचा अधिकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्राला कंगाल करण्याचा प्रयत्न

सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. मात्र, मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळे करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत, आता महाराष्ट्राच्या प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा कारभार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे दिला पाहिजे, अशी टीकाही अंधारे यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *