
मुंबई | Mumbai
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला त्यांचा भाऊ सापडला आहे. सुषमा अंधारे यांच्या बॅनर्समुळे त्यांचा भाऊ त्यांना सापडला आहे. युवराज जाधव असे त्यांच्या भावाचे नाव आहे....
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, लहानपणी घरातून तो बाहेर पडला होता. सुरूवातीचे दोन तीन महिने त्याची शोधाशोध केली. भाऊ परतल्यामुळे आम्ही सगळेच आनंदी आहोत. हे धक्कादायक तसेच अविश्वसनीय आहे. स्वत: युवराजसाठीही हे थोडे अवघडच आहे. सगळ्या संमीश्र भावना आहोत.
आम्ही सगळेच भावनिक गोंधळात आहोत. मात्र काहीही असो आज १८ वर्षांनी आमचे वाट पाहणे संपले आहे. आमचा भाऊ आमच्यासोबत आहे. यापेक्षा आणखी काय हवे, अशा भावना अंधारे यांनी व्यक्त केल्या आहेत.
बंधू युवराज जाधव (Yuvraj Jadhav) यांनीही घरी परतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. मी सध्यातरी गोंधळलेला आहे. मी माझ्या परिवाराला तब्बल १८ वर्षांनी भेटत आहे. मी माझ्या ताईमुळेच त्यांना सापडू शकलो, असे ते म्हणाले.