नारायण राणे
नारायण राणे
मुख्य बातम्या

सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या नसून हत्या

खा. नारायण राणे यांचा आरोप

Kishor Apte

Kishor Apte

मुंबई

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाला तरी मुंबई पोलिसांनी अजुन एफआयआर का दाखल केला नाही? या प्रकरणावर जाणूनबुजून दुर्लेक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

कोरोना संकटकाळात महाराष्ट्र राज्य रूग्णसंख्येत आणि मृत्यूदरातही अव्वल आहे. हा मृत्यूदर कमी करून अधिकाधिक लोकांना कोरोनामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, राज्य सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे खा. नारायण राणे यांनी केली. राणे म्हणाले की, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेगणिक वाढतच चालली आहे. मृत्यूदराचे टक्केवारीही कमी होत नाही. तरी राज्याचे मुख्यमंत्री हे घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्य कारभार सांभाळत आहेत.

‘सामना’ मुखपत्रातून मुलाखत देताना कोरोना परिस्थितीचा उल्लेख करत नाहीत. या मुलाखतीतून ते आपले अज्ञान जनतेला दाखवून देतात. मुख्यमंत्री घरातच बसून राहिल्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचाच दबाव नाही. या साऱ्या गोष्टीमुळे आपले राज्य सर्वच क्षेत्रात पिछाडीवर जात आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्विट मध्ये काहिही चुकीचे नाही तेव्हा त्यावर कोणाला टीका करण्याचाही अधिकार नाही असेही खा. राणे म्हणाले.

यावेळी नारायण राणे यांनी म्हटले की, सध्या राज्यात सरकार अस्तित्त्वात आहे, असे वाटतच नाही. मंत्रालयात केवळ अधिकारी बसून असतात. इतर कोणी मंत्रालयात जात नसेल तर ते कायमचे बंद करुन टाका. तसेही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि पूर्ण पगार मिळत नाही. राज्यातील कोरोना मृतांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. एकूणच काम न करणे, हेच सरकारचे धोरण असल्याची आगपाखड यावेळी नारायण राणे यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com