Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनसुशांत सिंह : बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार

सुशांत सिंह : बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार

नवी दिल्ली New Delhi

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात बिहार सरकारने सर्वोच्च (supreme court ) न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. त्यात हे प्रकरण बिहार पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचा दावा करत बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने या प्रकरणी सर्व पक्षकारांना गुरुवारपर्यंत लिखित उत्तर देण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

बिहार सरकारकडून वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी उत्तर दाखल केले. त्यात त्यांनी म्हटले की, बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सीआरपीसी 174 प्रमाणे सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचा तपास केले. 25 जून रोजी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर हे प्रकरण संपले. जर मुंबई पोलिसांना तपास करायचा होता तर FIR दाखल करायला हवी होती. बिहार पोलिसांकडे तक्रार दाखल होताच त्यांनी तपास सुरु केला.

सुशांतसिंहची बहीण श्वेतासिंह म्हणतात…

सर्वोच्च न्यायालयाची रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. दरम्यान सुशांतसिंह राजपूतची बहीण श्वेतासिंह किर्तीने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती म्हणते, मी तुम्हा सर्वांकडे एकच विनंती करत आहे की सर्वांनी एकत्र येऊन सीबीआय चौकशीची मागणी करावी. आम्हाला सत्य कळून घ्यायचा अधिकार आहे. आम्हाला सुशांतसाठी न्याय हवा आहे. नाहीतर आयुष्यभर आम्हाला शांती मिळणार नाही

- Advertisment -

ताज्या बातम्या