Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत क्लबवर पोलिसांचा छापा; सुरैश रैना, सुझान खानसहित ३४ जणांवर गुन्हा

मुंबईत क्लबवर पोलिसांचा छापा; सुरैश रैना, सुझान खानसहित ३४ जणांवर गुन्हा

मुंबई

मुंबई विमानतळाजवळील ड्रॅगन फ्लाय क्लबवर पोलिसांनी सोमवारी रात्री २.३० वाजता धाड टाकली. क्रिकेटपटू सुरेश रैनासह २७ सेलेब्रिटीज आणि ७ स्टाफ मेंबर्स विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश रैनासोबत बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान तसंच इतर काही सेलिब्रेटींवसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाशी संबधित नियमांचे पालन केल्याने तसेच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे”.

- Advertisment -

ताज्या बातम्या