राहुल गांधींना पुन्हा खासदारकी? आज निकालाची शक्यता

 राहुल गांधींना पुन्हा खासदारकी? आज निकालाची शक्यता

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) २३ मार्चला सुरत न्यायालयाने २०१९ मध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. यानंतर त्यांनी शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका (Petition) दाखल केली होती. त्यावर आज गुजरातमधील (Gujarat) सुरत शहरातील सत्र न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे...

 राहुल गांधींना पुन्हा खासदारकी? आज निकालाची शक्यता
Breaking News : नाशकात आयकर विभागाची छापेमारी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील (Karnataka) कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर गुजरातमधील भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता.

दरम्यान, या खटल्याच्या विरोधात सुरत न्यायालयाने (Surat Court) राहुल गांधींना दोषी ठरवत तब्बल चार वर्षांनी निकाल दिला. यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावर आज सत्र न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com