Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासूरज मांढरे यांनी स्वीकारला शिक्षण आयुक्त पदाचा पदभार

सूरज मांढरे यांनी स्वीकारला शिक्षण आयुक्त पदाचा पदभार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न असो, पदोन्नतीचा असो तसेच आस्थापनाविषयक सर्वच प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे नवे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी दिली….

- Advertisement -

राज्याच्या शिक्षण आयुक्त पदाचा कार्यभार पूर्वीचे आयुक्त विशाल सोळंकी (Vishal Solanki) यांच्याकडून स्वीकारल्यानंतर त्यांनी दैनिक देशदूतशी (Deshdoot) संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

शिक्षकाचा मुलगा ते राज्याचा शिक्षण आयुक्त हा प्रवास माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आहे. बाबा, शिक्षक असल्याने शिक्षणाचे (Education) महत्व आम्हाला लहानपणीच समजले होते.

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्या प्रश्नांची सर्वप्रथम माहिती घेणार आहे. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचे (Teachers) अनेक प्रश्न आहेत. यामध्ये वेतनाचा प्रश्न असेल, पदोन्नती, आस्थापनाविषयक प्रश्न, वैद्यकीय बिले, अंतिम भविष्य निर्वाह निधी आदी प्रश्न तसेच काही योजना, आदी प्रश्न सोडविण्यासाठी यात सुसूत्रता आणण्यासाठी माझे प्राधान्य राहणार आहे. दरम्यान, नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी माझे प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या