मला पोलिसांनी...; महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री बॅनरवरून सुप्रिया सुळे भडकल्या
मुंबई | Mumbai
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांना भावी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने दाखविणाऱ्या बॅनरबाजीची (banner) स्पर्धा लागली आहे. काही दिवसांपूर्वी अजितदादा भावी मुख्यमंत्री म्हणून झळकलेल्या बॅनरबाजीची मोठी चर्चा झाली असताना, आता पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्द्लही असाच बॅनर मुंबईत झळकवला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या जवळच ‘महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री’ (Woman Chief Minister) म्हणून थेट सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावण्यात आल्याने मोठी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. या बॅनरवर ज्येष्ठ नेते खा. शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र देखील आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
यापूर्वी अजित पवार, जयंत पाटील (Jayant Patil) यांचे बॅनरही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावले गेले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्या नावाने बॅनरबाजी झाल्याने या मागे कोण?, असा सवाल निर्माण होत आहे. मात्र, या साऱ्या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे ह्या चांगल्याच भडकल्या आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
बॅनरवर लावण्यात आलेल्या छायाचित्राविषयी सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून, अशा पद्धतीने परवानगी न घेता छायाचित्राचा सार्वजनिक ठिकाणी वापर करणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बॅनर लावणाऱ्यावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले, तसेच हे पोस्टर कोणी लावले, असा सवालही उपस्थित केला. एका महिलेचा फोटो पोस्टवर लावायला तुम्हाला कोणी अधिकार दिला, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, माझा फोटो मला न सांगता लावला आहे. मला पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, असे मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले आहे.