Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकेतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

केतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

न्यायालये (Court) असताना सोशल माध्यमाचा (Social Media) वापर करणे चिंताजनक बाब आहे. आपल्यावर मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीचे संस्कार आहेत. राजकरणाच्या 55 वर्षात हल्ले होऊन देखील शरद पवारांनी (Sharad Pawar) (वडीलांनी) कोणाला असे उत्तर दिले नाही. तसेच कोणाच्या वडिलांनी मरावे, अस बोलणारी संस्कृती कोणाची? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला…

- Advertisement -

ही आमची संस्कृती नसल्याचा आपणास अभिमान असल्याचे राष्ट्रवादीच्या लोकसभा गटनेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केतकी चितळेंचं (Ketki Chitale) नाव न घेता त्यांच्या पोस्टचा समाचार घेतला.

भोंगा : करायला गेले काय आणि घडलं भलतंच; जातीवादावरून सुप्रिया सुळे भडकल्या

हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे रविवारी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी चितळे प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहितरी लिहिले आहे. ते व्यक्ती स्वातंत्र आहे.

केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

ते कुठल्याच कायद्यात बसत नाही. त्याचवेळी मात्र हे खूप दुर्दैवी आहे. हा संस्कृतीचा भाग असून, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आणि राज ठाकरे यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवल्याबद्दल त्यांनी आभार मानले. अशी वेळ दुसर्‍या कोणावर आली तर मी देखील तुमच्या सोबत उभी राहील, असा विश्वास व्यक्त करुन यासर्व प्रकरणाचा निषेध नोंदवला.

नाशकात आले अन् मिस्सळ खाल्ली नाही तर काय खाल्लं?

राष्ट्रवादी विद्यार्थी कडून टाकण्यात आलेली पोस्ट चुकीची आहे. तो मुलगा नक्की पक्षात आहे की नाही याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, राष्ट्रवादीची ही परंपरा नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी रा. कॉ. पक्षातील काही जणांकडून चितळे प्रकरणावर सुरु असलेल्या टीकेचे समर्थन करणे त्यांनी टाळले. महागाई, सिलेंडर यापेक्षा मला काही महत्वाचे वाटत नाही. पंतप्रधानांना विनंती आहे की सर्व पक्षीय मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून महागाईवर काय करू शकतो यावर चर्चा करुन योग्य तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या खंजीर खुपसला टिकेला उत्तर देताना संसार म्हटले की भांड्याला भांड लागतच. सगळे थोडीच गुळगुळीत असते. आमचे भांडण देखील घरातच असते. शेवटी आपण ज्याच्याकडून अपेक्षा त्याच्याशीच भांडतो. त्यांनी पवार साहेबांकडे मागितले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या