सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे
मुख्य बातम्या

राज ठाकरेनंतर सुप्रिया सुळेंची ही मागणी

ट्वीट करुन राज्य सरकारकडे केली शिफारस

jitendra zavar

jitendra zavar

मुंबई

राज्यात अनलॉक सुरू झाल्यानंतर आजपासून एसटी बस सेवाही सुरू झाली आहे. मात्र, अजूनही काही सेवा बंद आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. आता सुप्रीया सुळे यांनी ही तिच मागणी केली आहे.

राज्यातील व्यायामशाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळे जिम चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. अनलॉक सुरू झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जीम सुरू कराव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जीम सुरू करण्याबद्दल मागणी केली आहे.

या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहेत. त्या ट्वीटसोवत राज्य सरकारला जीम चालकाचे पत्र पाठवले आहे. करोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद आहेत. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com