Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO | सुप्रिया सुळेंचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर; पियुष गोयल यांचं 'ते' पत्रचं आणलं...

VIDEO | सुप्रिया सुळेंचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर; पियुष गोयल यांचं ‘ते’ पत्रचं आणलं समोर

दिल्ली | Delhi

लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला चढविला. करोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये (Lockdown) महाराष्ट्रातील काँग्रेसने (Maharashtra Congress) मुंबईत (mumbai) स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश (UttarPradesh), बिहारमध्ये (Bihar) परत जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

- Advertisement -

त्यावर राष्ट्रवादीच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी जोरदार आक्षेप घेत मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत, असा टोलाही सुप्रीया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे. तसेच मंत्र्यांचं पत्रचं समोर ठेवून मोदींच्या वक्तव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी फडणवीसांनी (Devendra Fadnvis) तत्कालीन रेल्वेमंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना पाठवलेल्या पत्राचाही संदर्भ दिला. देशातील सर्वाधिक ट्रेन्स या राज्यांतून गेल्याची माहिती सुळे यांनी दिली. त्यांनी रेल्वे मंत्रालयाचा डेटा माध्यमांसमोर ठेवला. यामध्ये सर्वाधिक श्रमिक ट्रेन्स (Shramik trains) गुजरातमधून (Gujrat) गेल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रीया सुळे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण करोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोविडच्या तिसरी लाट ओरसत आहे, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले.

तसेच, आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या. राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या