Friday, April 26, 2024
Homeजळगावलताताई सोनवणेंच्या आमदारकीला ‘सुप्रिम’ धक्का

लताताई सोनवणेंच्या आमदारकीला ‘सुप्रिम’ धक्का

जळगाव jalgaon।

आमदार लता सोनवणे (MLA Lata Sonwane) यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (Tokare Koli belongs to Scheduled Tribe) सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) अवैध (invalid)ठरवले आहे. यामुळे शिंदे सरकारमध्ये (Shinde government) सहभागी झालेल्या चोपडा मतदारसंघाच्या (Chopda Constituency) आमदार लता सोनवणे यांच्यासाठी हा मोठा धक्का (Big shock) मानला जात आहे. त्यांची आमदारकीच धोक्यात (Legislature is in danger) आली आहे. आता त्यांना अपात्र ठरण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

नंदुरबार जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याप्रकरणी नुकत्याच शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार लता सोनवणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने आमदार लता सोनवणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी उच्च न्यायालयाचा निकाल कामय ठेवला आहे. यामुळे आमदार लता सोनवणे यांना मोठा झटका बसला आहे. जातप्रमाणपत्रच अवैध ठरल्याने लता सोनवणे यांच्या आमदारकीवरच टांगती तलवार आली आहे.

वळवी, वसावेंची होती तक्रार

जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून आमदार लता सोनवणे धनुष्यबाण या चिन्हावर अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार दिली होती.

न्यायालयात पुन्हा अपील करणार -सोनवणे

सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यासंदर्भात वकीलांशी चर्चा करून न्यायालयात पुन्हा अपील करणार असल्याचे माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.

हा मतदारसंघातील जनतेचा विजय -वळवी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण समाधानी आहोत. हा निर्णय म्हणजे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा निर्णय आहे. निवडणूक आयोगाने याबाबत पुढील प्रक्रिया लवकरात लवकर करावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी आ. जगदीशचंद्र वळवी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या