Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश

Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश

दिल्ली । Delhi

ज्ञानवापी मशिदीच्या केसने (Gyanvapi Masjid Case) देशातील वातावरण तापलं आहे. त्यावरच आज (शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) तिसऱ्यांदा सुनावणी झाली. न्यायमूर्ती वी आय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

याबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. तेथील सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करू नये. शिवलिंगाची जी जागा सील केली आहे, ती तशीच ठेवावी. वजूसाठी अरेंजमेंट करावी. वादा संदर्भातल्या सर्व केसेस वाराणसी स्थानिक न्यायालयापेक्षा जिल्हा न्यायालयाकडे वर्ग कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com